१. स्वयंपाकघरात पोळ्या मोजण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
‘मला प्रथमच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या काळात सेवेला येण्याची संधी मिळाली. अधिवेशनाच्या काळात मला तेथे स्वयंपाकघरात पोळ्या मोजण्याची सेवा मिळाली. (भाजलेल्या पोळ्या अंदाज येण्यासाठी मोजून ठेवतात.) मला उष्णतेचा त्रास होत असतांनाही देवाने ती सेवा माझ्याकडून करून घेतली. ही सेवा करतांना मी पुढीलप्रमाणे भाव ठेवला.
अ. सेवा करतांना माझ्या मनात सतत ‘माझे प्रारब्ध नष्ट होत आहे’, असा भाव होता आणि माझ्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू येऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.
आ. २ दिवस माझे हात फार दुखत होतेे. तेव्हा मी ‘भगवंता, सर्व वेदना सहन करून ही सेवा करण्यासाठी मला बळ द्या’, अशी सतत प्रार्थना करत होते. तेव्हा मी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ माझ्या दोन्ही हातांना धरून माझ्याकडून सेवा करून घेत आहेत’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला.
इ. ‘परात्पर गुरु डॉक्टर मला ही सेवा करण्यासाठी बळ देतील आणि तेच माझी क्षमता वाढवणार आहेत’, अशी श्रद्धा ठेवून मी सेवा करत होते.
२. पराठे करण्याची सेवा भावपूर्ण करतांना कार्यपद्धत शिकायला मिळणे
मला प्रवासाला जाणार्या साधकांसाठी डबे करण्याची सेवा मिळाली. त्यासाठी मला सकाळी लवकर उठून पराठे करायचे होते. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना माझ्याकडून भावपूर्ण सेवा होण्यासाठी प्रार्थना केली. भगवंताने माझ्याकडून ती सेवा भावपूर्ण करून घेतली. सेवा करतांना मला त्यातील पुष्कळ बारकावे शिकायला मिळाले. प्रत्येक क्षणी ‘कार्यपद्धतीचे पालन करायचेे आहे’, याची जाणीव होत होती.
३. वाढदिवसाच्या दिवशी संतांना भेटण्याची संधी मिळणे
आश्रमात रहाण्याच्या कालावधीत माझा वाढदिवस होता. मी एका संतांना प्रार्थना केली, ‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होऊ दे.’ त्यानंतर सकाळी मला उत्तरदायी साधकाकडून निरोप आला, ‘आज तुम्हाला संतांच्या सत्संगाला उपस्थित रहायचे आहे.’ त्या वेळी माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेने भावाश्रू येत होते. ‘संतांना आपल्या मनातील सर्वकाही कळते आणि आम्हा साधकांना आनंद देण्यासाठी ते आमची इच्छा पूर्ण करतात’, असे मला वाटले.
४. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे समष्टी रूप दिसणे
सत्संगाला सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकाही उपस्थित होते. त्यांना पाहिले असता ‘ते साक्षात् गुरुमाऊलीचे समष्टी रूप आहेत’, असे मला वाटले. एक क्षण त्यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप दिसले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती अल्प असतांनाही ते साधकांना साधनेसाठी चैतन्य देतात’, याची जाणीव होऊन मला भावाश्रू येत होते. त्या वेळी मला ‘आपण साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत आणि गांभीर्याने साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्यायला हवे’, याची जाणीव झाली.
गुरुमाऊलीने मला पुष्कळ आनंद दिला. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. अश्विनी रुद्रकंठवार (वय ४३ वर्षे), मानवत, जिल्हा परभणी.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |