रत्नागिरी – जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत दुचाकीवरून जातांना आता शिरस्त्राण (हेल्मेट) घालूनच जावे लागणार आहे; अन्यथा ५०० ते १००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो, तसेच वाहन चालवण्याचा अनुमतीही रहित होणार आहे. या संदर्भातील आदेश परिवहन विभागाने जारी केला आहे.
मोटारवाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार, तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार, याची कार्यवाही चालू झाली आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कर्मचार्यांना, तसेच कामानिमित्त येणार्या प्रत्येकाला शिरस्त्राण सक्तीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
परिवहन कार्यालयाच्या या पत्रानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कार्यालयात येणार्या प्रत्येक दुचाकीधारकावर कारवाई चालू केली आहे. त्यामुळे या कार्यालयाने शिरस्त्राण अनिवार्य केले असून, या आदेशाचे उल्लंघन करणार्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे.