माजलगाव (जिल्हा बीड) – मराठा आरक्षणाच्या संदर्भात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी भ्रमणभाषवर संपर्क साधून त्यांच्या ध्वनीमुद्रणाची क्लिप सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आली होती. क्लिप प्रसारित करणार्या धारूर तालुक्यातील धुनकवड येथील शेतकरी सुंदर भोसले याला अटक केली. त्याला न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
क्लिप सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आंदोलकांनी आमदार सोळंके यांच्या घरी जाऊन दगडफेक करून सोळंके यांचे घर पेटवून दिले होते. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अनेक तरुणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याचसमवेत माउली आगे आणि इतर २ अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी २ नोव्हेंबर या दिवशी कह्यात घेतले.