प्रवासी आणि माल वाहतुकीसह सर्वच क्षेत्रांत कोकण रेल्वेने केली सर्वोच्च कामगिरी ! – संजय गुप्ता

कोकण रेल्वेचा ३३ वा स्थापनादिन उत्साहात साजरा !

रत्नागिरी – कोकण रेल्वेने प्रवासी आणि माल वाहतुकीसह सर्वच क्षेत्रांत सर्वोच्च कामगिरी केली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष, तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरलेल्या कोकण रेल्वेने ३३ वा स्थापनादिन ३० ऑक्टोबर २०२३ या दिवशी उत्साहात साजरा केला. या वेळी कोकण रेल्वेच्या मागील ३३ वर्षांच्या कामगिरीची माहिती देतांना गुप्ता बोलत होते.

संजय गुप्ता पुढे म्हणाले की,

१. कोकण रेल्वेमार्गाचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे.

२. आतापर्यंतचा सर्वाधिक ९६३.४३ कोटी रुपयांचा प्रवासी महसूल मिळवला असून ७६७.४७ कोटी रुपयांचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल प्राप्त केला आहे.

३. कोकण रेल्वेने ३ सहस्र २७४.७० कोटी रुपयांचा सर्वाधिक प्रकल्प महसूल मिळण्यासमवेतच ५ सहस्र १५२.२३ कोटी रुपयांचा एकूण महसूल कमावला आहे.

४. कोकण रेल्वेला आतापर्यंतचा सर्वोच्च २७८.९३ कोटी रुपये इतका निव्वळ लाभ झाला आहे.

५. या कामगिरीत कोकण रेल्वेच्या कर्मचार्‍यांचा मोलाचा वाटा आहे.