स्वत:च्या संकल्पापेक्षा धर्मविजयाला महत्त्व देणारे भगवान श्रीकृष्ण ! – विनोदकुमार यादव, हिंदु जागरण मंच, बिहार

शेकडो शास्त्रज्ञ आणि पंडित यांनी ‘महाभारतातील युद्धात श्रीकृष्ण का जिंकला आणि कौरव का हरले ?’, याचा अभ्यास केला. तेव्हा त्या सर्वांना एकच उत्तर मिळाले, ‘श्रीकृष्ण आणि पांडव यांनी त्यांचा अहंकार सोडला, तसेच त्यांना धर्माचा विजय हवा होता. म्हणून ते जिंकले. याउलट कौरव पक्षातील भीष्मांचे म्हणणे होते, मी तर शस्त्रच हाती धरणार नाही.’ कुणी म्हणत होते, माझा मुलगा मारला गेला, तर मी युद्धच बंद करीन.’ कुणी म्हणत होते, ‘अर्जुनावरच शस्त्र चालवीन.’ कौरवांच्या पक्षात सर्व जण आपापल्या प्रतिज्ञेवर अडून बसले होते. म्हणून त्यांचा पराभव झाला.

पांडवांच्या पक्षात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा स्वतःचा संकल्प मोडला. युद्धापूर्वी ते म्हणाले होते, ‘मी शस्त्र उचलणार नाही.’ तथापि भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, ‘माझे वचन मोडले, तरी चालेल; परंतु हे धर्मयुद्ध जिंकले पाहिजे.’ यासाठीच भगवान श्रीकृष्ण यांनी रथाचे चाक हातात घेतले. भगवान श्रीकृष्णांचे ते रूप घेऊन आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात मार्गक्रमण करायचे आहे.