धर्मांध मुसलमानांचे धमकीयुक्त ‘हेट स्पिच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) !

‘नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून ‘आता या भारतात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य राहिले नाही’, अशी ओरड सातत्याने जन्महिंदु नेते, बुद्धीवादी, हिंदुविरोधी वृत्तपत्रे,  दूरचित्रवाहिन्या, तसेच मुसलमानांचे धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) या सर्वांकडून करण्यात येते. वास्तविकता काय आहे की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून हिंदूंचे वर्चस्व असह्य झाल्यामुळे हिंदुविरोधकांच्या जिव्हा नको तितक्या सैल सुटल्या आहेत. धर्मांध मुसलमान नेते आणि मुल्ला-मौलवी यांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या असून विष ओकण्यात आणि देशद्रोही विधाने करण्यात त्यांच्यात जणू स्पर्धा लागली आहे. धर्मांधांच्या या धमक्या, म्हणजे ही हिंदुद्वेषी विधाने हिंदूंनी गांभीर्याने घेतली पाहिजेत.

श्री. शंकर गो. पांडे

१. धर्मांधांच्या धमक्यांची मालिका !

अ. धर्मांधांचे एक एक विधान पाहिले की, त्यांच्या मनात हिंदुद्वेष किती ठासून भरला आहे आणि ते या देशातील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा किती मोठ्या प्रमाणात अपलाभ घेत आहेत, याची प्रचीती येते. सातत्याने हिंदुविरोधी गरळ ओकायची सवय झालेले ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन’ म्हणजे ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ या पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी एकदा म्हणाले होते, ‘‘या देशातील पोलिसांना १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवले, तर आम्ही २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना संपवू.’’

आ.  नुकतीच असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तरप्रदेशातील निवडणुकीनिमित झालेल्या एका जाहीर सभेत गरळ ओकली. ते म्हणाले, ‘‘या राज्यातील पोलिसांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आणि योगी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर नेहमीसाठीच रहाणार नाहीत. कधी तरी मोदी हिमालयात जातील आणि योगी त्यांच्या मठात जातील. मग तुमची गाठ आमच्याशी आहे. त्या वेळेस तुम्हाला कोण वाचवणार ?’’

अकबरुद्दीन ओवैसी

इ. देहली आणि इतरत्र मुसलमान समाजाचे ‘सीएए’ (नागरिकत्व  सुधारणा कायदा) विरुद्ध आंदोलन चालू असतांना एम्.आय.एम्. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते वारीस पठाण यांनी कर्नाटकमधील गुलबर्गा येथे एक जाहीर सभा घेतली होती. त्या सभेत मुक्ताफळे उधळतांना ते म्हणाले होते, ‘‘आम्ही या देशात १५ कोटी आहोत; पण १०० कोटी हिंदूंना वरचढ आहोत. शाहीनबागमध्ये आंदोलन करणार्‍या आमच्या वाघिणींनीच तुम्हाला घाम फोडला आहे. मग आम्ही १५ कोटी मुसलमान एकत्र रस्त्यावर उतरलो, तर तुमचे काय होईल ? हे समजून घ्या.’’

ई. केरळमधील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. फजल कफूर यांनी तर भारतातील न्यायव्यवस्थेलाच नाकारले होते. ते म्हणाले होते, ‘‘सीएए’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला, तर आम्ही दुसर्‍या टप्प्याचा संघर्ष चालू करू. आम्हा आंदोलनकर्त्यांपेक्षा या देशातील कोणतेच न्यायालय मोठे नाही. आम्ही आमच्या शस्त्रांनी सज्ज आहोत आणि आमची ‘टारगेट्स’ही (लक्ष्यही) ठरली आहेत.’’

उ. शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ‘तीन तलाक’विरुद्ध निर्णय देऊन मुसलमानांनी महिलांच्या पोटगीचा हक्क मान्य केला होता. तेव्हा मुसलमानांनी न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीचे जाहीरपणे दहन केले होते.

ऊ. ‘सीएए’विरुद्ध आंदोलन चालू असतांना उत्तरप्रदेशमधील काँग्रेसचे एक नेते नसिमुद्दीन बरळले होते, ‘‘आम्ही आधी मुसलमान आहोत नंतर हिंदुस्थानी. इस्लामशी टक्कर घेणार्‍या राज्यघटनेला आम्ही मानणार नाही. आम्ही या देशाशी निष्ठावंत नाही. निष्ठावंत तर कुत्रे असतात.’’

ए.  ‘जे.एन्.यू.’च्या (जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या) शर्जिल नावाच्या एका बेशरम विद्यार्थ्याने एक बेलगाम विधान केले होते. तो म्हणाला होता, ‘‘आम्हाला ईशान्य भारत आणि आसाम भारतापासून तोडायचे आहे. मी कट्टरतावादी विचारसरणी मानतो आणि ‘भारत इस्लामिक देश व्हावा’, असे माझे स्पष्ट मत आहे.’’

ऐ. गोरखपूर (उतरप्रदेश) येथील बाबा रामदेवदास वैद्यकीय महाविद्यालयातील ७० लहान मुलांचा मृत्यू वर्ष २०१७ मध्ये ज्या काफील खानमुळे झाला होता, ते खान महाशय अलिगड मुस्लिम विद्यापिठात विद्यार्थ्यांसमोर म्हणाले होते, ‘‘सीएए’ हा कायदा भारतीय मुसलमांना दुय्यम नागरिकत्व देणारा आहे. लक्षात ठेवा, आम्ही या देशात २५ कोटी आहोत. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. राज्य कसे करायचे, ते आम्हाला चांगले समजते.’’

झाकीर नाईक

ओ. कायदेशीर कारवाईच्या भीतीने भारतातून पळून जात तुर्कीयेमध्ये आश्रय घेतलेला मौलाना डॉ. झाकीर नाईक प्रक्षोभक विधाने करत असतो. त्याच्या जिहादी होण्याच्या शिकवणीपासूनच प्रेरणा घेऊन काही मुसलमान युवकांनी बांगलादेशात वर्ष २०१७ मध्ये बाँबस्फोट घडवला होता, त्यात ४ नागरिक आणि २ पोलीस अधिकारी ठार झाले होते, तर ४० जण गंभीर घायाळ झाले होते. ढाक्यात केलेल्या बाँबस्फोटातील आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी मान्य केले होते, ‘जिहादी बनण्याची प्रेरणा आम्हाला झाकीर नाईक याच्या भाषणातूनच मिळाली होती.’ अशा या जिहादी झाकीर नाईकने मुक्ताफळे उधळतांना एक स्फोटक; पण वस्तूस्थितीवर प्रखर प्रकाश टाकणारे विधान केले होते. तो म्हणाला होता, ‘‘मुसलमानांनी भारतावर १ सहस्र १०० वर्षे राज्य केले होते. लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या. कोट्यवधी हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवले. हिंदूंची २ सहस्र मंदिरे तोडून तेथे मशिदी बांधल्या. भारताचे तुकडे करून बांगलादेश आणि पाकिस्तान अशा दोन मुसलमान राष्ट्रांची निर्मिती केली. तरीही आजचा येथील आमची भीती वाटणारा हिंदु ‘हिंदु-मुस्लिम भाई भाई’, असे नारे देतो. ही आमच्या इस्लामची शक्ती आहे.’’

औ. देहलीच्या जामा मशिदीचे सर्वच इमाम त्यांचे वादग्रस्त वर्तन आणि विधाने यांविषयी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. इमाम पदावर असतांना मौलाना सैय्यद अहमद बुखारी म्हणाले होते, ‘‘उत्तरप्रदेश, बंगाल, केरळ, हैद्राबाद (भाग्यनगर) आणि आसाम या राज्यांत आता मुसलमान बहुसंख्य झाले आहेत. इस्लाम धर्मानुसार गैरमुसलमानांनी इस्लामबहुल राज्यात रहाणे हराम आहे. तेव्हा तेथील हिंदूंनी वरील राज्यातून अन्यत्र निघून जावे. नाही तर आम्हाला काश्मीरमधील पंडितांसमवेत जो व्यवहार केला, तो वरील मुसलमानबहुल राज्यातील हिंदूंसमवेत करावा लागेल.’’

अं. खरे तर धर्माच्या आधारावर मते मागणे, हा गुन्हा आहे. धर्माच्या आधारावर मते मागितल्याचा आरोप ठेवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क वर्ष १९९९ मध्ये ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आला होता; पण उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे एक नेते राफिक अन्सारी यांनी सरळ धर्माच्या आधारावर मुसलमानांची मते मागितली होती. एका जाहीर सभेत समाजाला उद्देशून म्हणाले होते, ‘‘गेली ५ वर्षे आपण मुसलमानांनी उत्तरप्रदेशात योगी यांच्या रूपाने हिंदूंच्या दहशतीत घालवले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये हिंदूचेच प्राबल्य आहे. त्यांच्याकडून आपल्या समाजातील लोकांना लक्ष्य करून कारागृहात पाठवण्यात आले आहे. आता येणार्‍या निवडणुकीत संधी गमावू नका. नाही तर तुम्हाला पुन्हा ५ वर्षे हिंदूंच्या गुलामीत रहावे लागेल.’’

धर्मांध मुसलमान

क. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ‘हिंदूंचा द्वेष आणि मुसलमानांचा अनुनय’ या घातक धोरणामुळे तेथील मुसलमानांचे वर्तन अन् वक्तव्य यांवर कोणतेही बंधन उरले नाही. या राज्यातील टिपू सुलतान मशिदीचे इमाम नुरुल रहमान बरकती एकदा म्हणाले होते, ‘‘हिंदूंनी कितीही विरोध केला, तरी आम्ही भारतीय मुसलमान गोहत्या करूच. मुसलमान कोणत्याच सरकारला भीत नाहीत; कारण आता आमची लोकसंख्या पुष्कळ वाढली आहे. आम्ही हिंदूंप्रमाणे वायफळ चर्चा आणि वादविवाद करत बसत नाही, तर सरळ कापून टाकतो.’’

ख. देहलीमध्ये ‘सीएए’विरोधी आंदोलनात हिंसा पसरवण्याच्या आरोपाखाली अलिगड मुस्लिम विद्यापिठाचा विद्यार्थी शर्जिल उस्मानी हा कारावासाची शिक्षा भोगून आलेला जिहादी वृत्तीचा एक मुसलमान. १८.२.२०२१ या दिवशी एल्गार परिषदेत तो म्हणाला, ‘‘हिंदु समाज एक सडलेला समाज आहे. माझा या देशातील पोलीस आणि न्यायव्यवस्था यांवर थोडाही विश्वास नाही.’’

ग. कर्नाटकमधील शाळेत मुसलमानांनी मुलींच्या हिजाब घालून येण्याच्या हट्टामुळे शिक्षणक्षेत्रात एका नवीन वादाला आरंभ झाला. काही हिंदु मुलांनी याला विरोध केला. तेव्हा काँग्रेसचा एक नेता मुकर्रम खान म्हणाला, ‘‘हिजाबचा विरोध करणार्‍यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील.’’ कदाचित् त्यांच्या अशा प्रक्षोभक विधानामुळेच हर्षा या हिंदु तरुणाची धर्मांध जमावाकडून निर्घृण हत्या झाली असावी.

 २. धर्मांधांच्या धमक्यांतून निघणारे निष्कर्ष

या देशातील धर्मांध मुसलमानांनी अशी कितीतरी प्रक्षोभक वक्तव्ये केली आहेत. त्यांची सर्व प्रक्षोभक विधाने एकत्र केली, तर एक जाडजूड पुस्तक सिद्ध होईल; म्हणून काही मोजकीच विधाने या लेखात दिली आहेत. मुसलमानांच्या या प्रक्षोभक विधानांवरून मी काढलेले निष्कर्ष असे –

अ. मुसलमान समाजाच्या मनात हिंदूंविषयी आत्यंतिक द्वेष भरलेला असून हा द्वेष मुसलमान समाजाचे धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवींकडून भरवला गेला आहे.

आ. मुसलमानांचे धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी लोकसंख्येच्या आधारावर एक तर भारताला इस्लामी राष्ट्र बनवू इच्छितात किंवा विभाजित करू इच्छितात.

इ. भारताच्या सर्वोच्च पदी हिंदुत्वनिष्ठ नेता असणे किंवा भारतात हिंदूंचे वर्चस्व असणे मुसलमानांना कदापिही मान्य होणार नाही.

ई. मुसलमानांचा या देशाचा कायदा आणि राज्यघटना यांवर अजिबात विश्वास नाही. त्यांना समान नागरी कायद्यापेक्षा शरीयतचे कायदे अधिक प्रिय आहेत.

उ. या देशात धर्मांधांना अभिव्यक्तीचे अमर्याद स्वातंत्र्य दिले गेले असून ते आता घातक पातळीपर्यंत पोचले आहे.

३. धर्मांधांच्या सुरात सूर मिसळवणारे जन्महिंदू

धर्मांधांना या देशात अभिव्यक्तीचे एवढे स्वातंत्र्य असूनही जेव्हा त्यांच्याकडून  नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून ‘जनतेचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य हिरावले गेले’, अशी ओरड होते आणि त्यांच्या सुरात अपघाताने जन्मलेले हिंदू सूर मिळवू लागतात, तेव्हा ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ पाहून मोठा संताप येतो.

४. पाक किंवा बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदु भारतातील अल्पसंख्यांकांप्रमाणे धमकी देणारी विधाने करू शकतो का ?

याच अनुषंगाने माझ्या मनात एक प्रश्न नेहमी उभा रहातो. या देशातील अल्पसंख्य मुसलमान बहुसंख्य हिंदूंविरुद्ध जसे वाटेल तसे प्रक्षोभक विधान वा वक्तव्य करू शकतो, तसे पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्य हिंदु तेथील बहुसंख्य मुसलमानांविरुद्ध एखादे तरी प्रक्षोभक विधान करण्याचे धैर्य  करू शकतो का ? आणि एखाद्याने असे धैर्य केलेच, तर तो जिवंत राहू शकतो का ?

५. हिंदूंच्या वास्तव विधानांवर जन्महिंदू मात्र आकाशपाताळ एक करतात !

अ. पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंविषयी बोलणे जाऊ द्या; पण आज बहुसंख्य हिंदू असणार्‍या हिंदुस्थानमधील हिंदूंना पुराव्यावर आधारलेले परखड मत व्यक्त करतांनाही अगोदर सहस्र वेळा विचार करावा लागतो; कारण या देशात अपघाताने जन्मलेले हिंदू मुसलमानांच्या प्रक्षोभक विधानावर मूग गिळून स्वस्थ बसत असले, तरी हिंदूंच्या वास्तवावर आधारलेल्या विधानांवर मात्र आकाशपाताळ एक करतात. कालीचरण महाराजांनी  गांधींविषयी त्यांचे परखड मत व्यक्त केले. परिणाम काय झाला ? त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.

आ. १७ आणि १८ डिसेंबर २०२१ या दिवशी हरिद्वार येथे हिंदुत्वाच्या संबंधात साधूसंतांनी एका धर्मसंसदेचे आयोजन केले होते. त्या संसदेत सध्याची मुसलमान समाजाची जिहादी वक्तव्ये आणि वर्तन पाहून काही साधूसंतांनी प्रतिक्रियात्मक म्हणून आक्रमक भाषेचा वापर केला होता. मुसलमान नेते आणि मुल्ला-मौलवी यांची प्रक्षोभक वक्तव्ये पाहिली, तर हिंदु साधूसंतांच्या वक्तव्यांना प्रक्षोभक म्हणता येणारच नाही. काय हिंदूंनी धर्मासाठी आणि आत्मरक्षणासाठीही शस्त्र उचलू नयेत ? काय हिंदूंनी स्वधर्मियांची लोकसंख्या नियंत्रित ठेवून मुसलमानांना त्यांची लोकसंख्या वाढावयाचा मुक्त परवाना द्यावा ?

६. जिहादी हिंसक भाषा सर्रास वापरतात, तेव्हा जन्महिंदू कुठल्या बिळात जातात ?

पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंचे पूर्णतः निर्मूलन होत असतांना आणि सलग १० वर्षे भारताचे उपराष्ट्रपतीपद उपभोगणार्‍या हमीद अन्सारी यांचा देशविघातक अनुभव गाठीशी असतांना परत भारताच्या पंतप्रधानपदावर मुसलमान व्यक्तीला बसवण्याची चूक करावी ?; पण सत्य बोलल्यामुळेही हिंदु साधूसंतांविरुद्ध अपघाताने जन्मलेल्या हिंदूंनी कायदेशीर कारवाई केली. अपघाताने हिंदु असलेल्या १०० तथाकथित बुद्धीवाद्यांकडून भारताच्या पंतप्रधानाकडे एक संयुक्त निवेदन पाठवण्यात येऊन त्याद्वारे हिंदु साधूसंतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी जेव्हा जिहादी आणि हिंसक भाषा सर्रासपणे वापरतात, तेव्हा हे जन्महिंदू बुद्धीवादी कोणत्या बिळात लपलेले असतात ? हे काही समजत नाही. (क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.