भारताने कॅनडासमवेत पुन्हा आरंभिली व्हिसा सेवा !

सध्या ४ श्रेणींमध्येच देण्यात येणार व्हिसा !

(व्हिसा म्हणजे देशात काही कालावधीसाठी रहाण्याची अनुमती)

नवी देहली – भारताने कॅनडासमवेतच्या व्हिसासेवेला पुन्हा प्रारंभ केला आहे.  कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केल्यानंतर भारताने ही सेवा स्थगित केली होती. भारताच्या व्हिसासेवा चालू करण्याच्या निर्णयाचे कॅनडाने स्वागत केले आहे. कॅनडाने म्हटले की, दोन्ही देशांचे संबंध पहाता, हा चांगला संकेत आहे.

भारताने सध्या ४ श्रेणींमध्ये व्हिसासेवेस प्रारंभ केला आहे. यांतर्गत प्रवेश, उद्योग, वैद्यकीय आणि परिषद यांसाठी व्हिसा देण्यात येणार आहे.