मोठ्या संख्येने धारकरी, वीर बजरंगी, दुर्गा आणि मातृशक्ती सहभागी !
भोर (जिल्हा पुणे) – नवरात्रोत्सव काळात प्रतिवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर या दिवशी या दौडची सांगता झाली. भोर येथील शिवतीर्थ चौपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आणि प्रेरणा मंत्राने या दौडचा प्रारंभ झाला. सुवासिनींनी रांगोळ्या काढून आणि औक्षण करून दौडचे स्वागत केले. भैरवनाथ मंदिर भोलावडे येथे सांगता सभा झाली. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमास ३ सहस्र हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते. तसेच काळेपडळ, हडपसर येथेही दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीही सहभागी झाली होती. सांगता सभेत हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. याचा लाभ १५० हून अधिक जणांनी घेतला. उत्सवानिमित्त आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, दुर्गावाहिनी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने धारकरी, वीर बजरंगी, दुर्गा आणि मातृशक्ती उपस्थित होते.
गेल्या ५ वर्षांपासून मंचर, घोडेगाव, पेठ, पिंपळगाव घोडा, चांडोली खुर्द, शिनोली-कानसे या ठिकाणी दुर्गामाता दौडीचे आयोजन करत आहेत. भोर येथील दौडीच्या वेळी इतिहास अभ्यासक व्याख्याते श्री. नीलेशजी भिसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख श्री. धनंजय पवार यांनी त्यांचे स्वागत आणि आभारप्रदर्शन केले. हिंदूंच्या सर्व संतांनी संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना केली.