मुंबई – येथील पश्चिम रेल्वेमार्गावर लवकरच ६ व्या मार्गिकेचे काम चालू करण्यात येणार आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत या मार्गावरील २ सहस्र ५०० रेल्वेच्या फेर्या रहित करण्यात येणार आहेत.
विरार आणि चर्चगेट या मार्गावरून येणार्या आणि जाणार्या रेल्वेगाड्या या कामानिमित्त रहित करण्यात येणार आहेत. या कालावधीत लांब पल्ल्याच्या ४३ गाड्याही रहित करण्यात आल्या आहेत. राजस्थान, गुजरात, नवी देहली, उत्तरप्रदेश येथे जाणार्या आणि या राज्यांतून महाराष्ट्रात येणार्या गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. वर्ष २००२ मध्ये पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरिवली आणि सांताक्रूझ ही मार्गिका कार्यान्वित करण्यात आली होती. ६ व्या मार्गिकेनंतर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे रेल्वेमार्ग वेगळे करण्याच्या दृष्टीने प्रयत्नही चालू आहेत.