‘१५.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘काली यागा’चे आयोजन करण्यात आले होते. यागाचा उद्देश पुढीलप्रमाणे होता, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, साधकांच्या सर्व आध्यात्मिक त्रासांचे निवारण व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी.’ या यागाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. यागाला आरंभ होतांना सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील साधक-पुरोहितांनी कालीदेवीशी संबंधित मंत्र म्हटले. तेव्हा यज्ञवेदीपासून १ मीटर उंचीवर एक सोनेरी रंगाचे मोठे सूक्ष्म यंत्र दिसले. त्या यंत्रातून तेवढ्याच आकाराची असंख्य सूक्ष्म यंत्रे सिद्ध होऊन त्यांचे वातावरणात प्रक्षेपण होऊ लागले. ती कालीदेवीची यंत्रे होती.
२. ‘यज्ञकुंडातून पेटत्या अग्नीप्रमाणे पुष्कळ दैवी ऊर्जा बाहेर पडत आहे’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले.
३. यागातून वातावरणात प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्यामुळे माझे मन शांत आणि स्थिर झाले.
४. यज्ञकुंडातून पिवळ्या रंगाच्या दैवी फुलांचे पाण्याच्या कारंज्याप्रमाणे वातावरणात प्रक्षेपण होऊ लागले.
५. यज्ञकुंडापासून काही अंतरावर केस मोकळे सोडलेली एक स्त्री मला सूक्ष्मातून दिसली. ती अतृप्त शक्ती होती. तिच्या शरिरावरील वस्त्रे फाटकी होती. तिचे डोळे लाल रंगाचे होते. ती अतृप्त शक्ती ‘स्वत:ला या यागातून काही दैवी शक्ती मिळेल का ?’, असा विचार करत होती. ‘या यज्ञाद्वारे तिची दरिद्रता दूर होईल ना ?’, अशा विवंचनेत ती होती. त्यानंतर थोड्या वेळात त्या स्त्रीने स्वतःच्या जिभेची लांबी वाढवून ती यज्ञकुंडाच्या जवळ आणली. तिने जिभेद्वारे यागातील चैतन्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.
६. यज्ञकुंडातून वातावरणात सूक्ष्म दैवी कणांचे प्रक्षेपण होऊ लागले. ते दैवी कण पुष्कळ तेजस्वी होते. त्यानंतर यज्ञकुंडापासून काही उंचीवर सूर्याप्रमाणे दिसणारा पांढर्या रंगाचा एक तेजस्वी गोळा दिसला.
७. ‘यज्ञवेदीवर काही देव आणि देवी स्वत:चे हात जोडून उभे आहेत आणि ते यागाला नमस्कार करत आहेत’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. त्या सर्व देव आणि देवी यांनी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते.
८. यज्ञकुंडातून पांढरा आणि निळा, असा एकत्रित रंग असलेल्या दैवी कणांचे वातावरणात प्रक्षेपण होऊ लागले. त्यांचे पुढे निळा आणि पांढरा हे रंग असलेले दोन भिन्न कण सिद्ध होत होते. त्यानंतर त्या भिन्न कणांतून भिन्न कार्य व्हायचे.
९. यज्ञकुंडातून सूक्ष्मातून पांढर्या रंगाचे बाण सुटत होते आणि ते तेथे उपस्थित असलेल्या साधकांच्या भोवती ढगाच्या आकाराप्रमाणे असलेल्या त्रासदायक (काळ्या) शक्तीला लागत होते. तेव्हा त्या त्रासदायक शक्तीचे वातावरणात विघटन होत होते.
१०. ‘यागाच्या शेवटी लघुपूर्णाहुती चालू असतांना त्यातील हविर्भागाचा स्वीकार करण्यासाठी यागाच्या मध्यभागी एक देवी सोनेरी रंगाचे पात्र घेऊन उभी आहे’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१०.२०२३)
|