शत्रूशी लढण्यासाठी सर्व शक्तीचा वापर करू !

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची चेतावणी

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

तेल अविव (इस्रायल) – शत्रूंनी किंमत मोजायला प्रारंभ केला आहे. पुढे काय होईल, ते सांगता येत नाही; पण हा केवळ प्रारंभ आहे. ज्यू नागरिकांवर लादलेल्या युद्धाला आम्ही कदापीही क्षमा करणार नाही. शत्रूशी लढण्यासाठी सर्व शक्तीचा वापर करू, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.