पुढच्या जन्मासंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ज्ञानयोग सोडून अध्यात्मातील इतर अनेक विषयांवर ग्रंथ लिहिण्यासाठी अभ्यास करण्यात पुढचे आयुष्य जाणार असल्यामुळे माझा फक्त ज्ञानयोगाचा अभ्यास या जन्मात होऊ शकणार नाही. त्यामुळे मला ज्ञानयोगाच्या अभ्यासासाठी पुढचा जन्म घ्यावा लागेल’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, अनेक विषयांवर ग्रंथ लिहिण्यासाठीचे लिखाण मी तयार ठेवले आहे. त्यावरून ग्रंथांचे संकलन करणारे पू. संदीप आळशी आणि ग्रंथ विभागातील इतर साधक ते ग्रंथ पूर्ण करू शकतील. असे असल्यामुळे मी ज्ञानयोगाचा अभ्यास उरलेल्या आयुष्यातच केला, तर मला त्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागणार नाही. ईश्‍वर ज्या कार्यासाठी मला पुन्हा जन्माला घालेल, ते कार्य मला करता येईल.’

– परात्पर गुरु डॉ. आठवले (२३.७.२०२३)