पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर ठोस पुराव्यांविना केलेले आरोप दुर्दैवी ! – अमेरिका भारत स्ट्रटेजिक पार्टनरशीप फोरम्

मुकेश अघी व जस्टिन ट्रुडो

वॉशिंग्टन – खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कुठल्याही ठोस पुराव्यांविना भारतावर केलेले आरोप दुर्दैवी आहेत, असे मत ‘अमेरिका भारत स्ट्रटेजिक पार्टनरशीप फोरम्’ (यु.एस्.आय.एस्.पी.एफ्.) या संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अघी यांनी व्यक्त केले आहे. या आरोपानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने कॅनडाचे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.


अघी पुढे म्हणाले की, ‘भारत आशि कॅनडा यांच्यातील संबंध फार जुने आहेत. दोन्ही देशांमध्ये मोठा व्यापार चालू आहे. कॅनाडामध्ये २ लाख ३० सहस्रांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कॅनडाने भारतात अनुमाने ५५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप देशांतर्गत राजकारणामुळे प्रेरित आहेत आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते शीखबहुल पक्षावर अवलंबून आहेत.’