भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास बंद होणार नाही : उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

नवी देहली – देहलीतील अफगाणिस्तानचे दूतावास आणि मुंबई अन् भाग्यनगर येथील वाणिज्य दूतावास बंद होणार नाहीत. अफगाणिस्तानच्या भारतातील मुख्य राजदूतांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतल्यानंतर हे स्पष्ट केले. भारतातील दूतावास आणि वाणिज्य दूतावास बंद केल्याची अफवा अफगाणिस्तानचे अन्य एक राजदूत मामुंदझाई यांनी पसरवली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्याची विनंतीही मुख्य राजदूतांनी परराष्ट्र मंत्रालयाला केली. ते राजदूत सध्या अफगाणिस्तानातच  रहात आहेत. अफगाणिस्तानचा नवी देहलीतील दूतावास कार्यरत असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.