नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२३ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२३ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi
करवीर (कोल्हापूर) हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ असून येथे श्री महालक्ष्मीदेवीचा सदैव वास असतो. श्री महालक्ष्मीदेवीचे हे स्थान आजही जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. ‘अंबाबाई’ या नावाने सुपरिचित असलेल्या या देवीचे हे स्थान ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते.
श्री महालक्ष्मीदेवीच्या स्थानाचा इतिहास
एका कथेनुसार करवीर क्षेत्रातील कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. श्री महालक्ष्मीदेवीने त्याचा वध केला. कोल्हासुराच्या अंतिम समयीच्या विनंतीनुसार या क्षेत्राचे नाव ‘कोल्हापूर’ करण्याचे आणि याच ठिकाणी वास्तव्य करण्याचे श्री महालक्ष्मीदेवीने मान्य केले.
श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती
श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती वालुकामय हिरकखंडमिश्रित रत्नशीलेची बनवलेली आहे. मस्तकी मुकुट धारण केलेल्या देवीच्या मूर्तीची उंची ३ फूट असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीच्या पाठीमागे समोर तोंड करून सिंह उभा आहे, तर मूर्तीवर शेषनागाने छाया धरली आहे. मूर्ती चतुर्भुज असून देवीने वरील हातांत गदा आणि खेटक (ढाल), तसेच खालच्या उजव्या हातात मातुलिंग (म्हाळुंग), तर डाव्या हातात भवरोगहारक ज्ञानामृताने भरलेले पानपात्र धारण केले आहे. (संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी’)