सातारा जिल्ह्यातील ४ मतदानकेंद्रे पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला !

सातारा, २ ऑक्टोबर  (वार्ता.) – निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरण करणे, सदस्य संख्या वाढीसाठी बैठका घेणे, मोर्चेबांधणी करणे आदी कामे चालू आहेत. दुसर्‍या बाजूला निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील नवीन मतदानकेंद्रे पुनर्गठित करण्याविषयीच्या प्रस्तावाचे काम जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे निवडणूक विभागाकडून केले जात आहे.

जिल्ह्यातील ४ मतदानकेंद्रे पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवडणूक आयोगाकडून पाठण्यात आला आहे. सातारा येथे नुकतीच उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी २६२ या सातारा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचा आढावा संबंधित शासकीय अधिकार्‍यांकडून घेण्यात आला.