नाशिक येथे ७ गणेशभक्‍तांचा दुर्दैवी मृत्‍यू !

नाशिक – येथील शहर परिसरातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांमध्‍ये ४ घटनांमध्‍ये ७ गणेशभक्‍तांचा दुर्दैवी मृत्‍यू झाला. तिघेजण गोदावरी नदीत बुडाले, तर वालदेवी धरण परिसरात एकजण बुडाला. चेहेडी संगमावर दोघे मित्र बुडाले, तर मिरवणूक पहाण्‍यासाठी गेलेल्‍या चिमुरड्याचा ट्रॅक्‍टरखाली येऊन मृत्‍यू झाला.