मराठीबहुल महाराष्ट्रात अशा घटना घडणे दुर्दैवी !
मुंबई – मुलुंड येथे एका मराठी तरुणीला ती मराठी असल्यामुळे जागा देण्यास नकार दिला होता. याविषयी बोलतांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या, ‘‘शासकीय बंगला सोडल्यानंतर मी मुंबईत घर शोधतांना मलाही मराठी म्हणून घर नाकारले होते. ‘मराठी लोकांना आमच्या भागात घर देत नाही’, हे शब्द मीही अनुभवले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाषावाद, प्रांत या विषयावर मी कधी भाष्य करत नाही; परंतु सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून मन खिन्न होते.’’