गुजरात उच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या वेळी दिला स्कंद पुराणाचा संदर्भ !

कर्णावती (गुजरात) – गुजरात उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना स्कंद पुराणाचा संदर्भ दिला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर ती गरोदर राहिल्याने तिने गर्भपात करावी, असे तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. यावर न्यायालयाने सुनावणी करतांना म्हटले, ‘मुलीचे आई-वडील तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकू शकत नाहीत;’ मात्र त्याच वेळी न्यायालयाने मुलीची गर्भपात करण्याची इच्छा असेल, तर ती गर्भपात करू शकते’, असा निर्णयही दिला. न्यायमूर्ती समीर दवे यांनी या खटल्यावरील सुनावणीच्या वेळी पूर्वी मनुस्मृतीचाही उल्लेख केला होता.
न्यायमूर्ती दवे म्हणाले की,  भारतीय संस्कृतीमध्ये आईला दर्जा सर्वांत वर आहे. स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे की, ‘नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गतिः।

नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रपा॥’ (स्कंद पुराण, अध्याय ६, १०३-१०४) (अर्थ : आईसारखी सावली नाही, आधार नाही, आईसारखे संरक्षण नाही. आईसारखा जीवनदाता या जगात दुसरा कुणी नाही.) म्हणजे आईसमान कुणीही जीवन देऊ शकत नाही. आईच्या पदरासारखे सुरक्षेचे भाव अन्य कुणीही देऊ शकत नाही.