‘१५.९.२०१८ या दिवशी मी सौ. राधा गावडे यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.
१. गणपतीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती होत होती. ‘गणपति बोलत आहे आणि त्याच्या डोळ्यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.
२. श्री. घनश्यामदादा आणि सौ. राधाताई या दोघांमध्ये पुष्कळ भाव आहे. त्यांच्याकडे बघून ‘माझ्यावर उपाय होत आहेत. त्यांचे घर म्हणजे गोकुळ आहे’, असे मला जाणवले. माझा कृतज्ञताभाव दाटून आला.
३. त्यांच्या गावातील नवदुर्गादेवीचे मंदिर बघण्यासाठी दादा आम्हाला मंदिरात घेऊन गेले. मी देवीला प्रार्थना करतांना मला देवीच्या मानेवरून पांढरे फूल खाली पडतांना दिसले. ‘देवीने ही अनुभूती देऊन आमच्यावर मोठी कृपा केली आहे’, असे मला वाटले.
४. आश्रमात आल्यानंतर संध्याकाळी मी चालत असतांना मला अकस्मात एका संतांचे दर्शन झाले. तेव्हा ‘गणपतीने मला दर्शन दिले’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.’
– सौ. वैशाली मुदगल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |