‘पाश्‍चात्त्य देश वाईट आहेत’, या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

थिरूवनंतपूरम् (केरळ) – माझ्या मते आपल्याला ‘पाश्‍चात्त्य देश वाईट आहेत’, ‘ते विकसनशील देशांच्या विरोधात आहेत’ या भूतकाळातील घटनांतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले. ‘मी पाश्‍चात्त्य देशांची वकिली करत नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.