पुसेसावळी (सातारा) येथील दंगलीमध्ये विक्रम पावसकर यांचा हात असल्याचा आरोप खोटा ! – विनायक (अण्णा) पावसकर

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना (डावीकडून) सर्वश्री राहुल यादव, सागर आमले, काकासाहेब जाधव, विनायक (अण्णा) पावसकर, चंद्रकांत जिरंगे आणि हेमंत सोनवणे

सातारा, १४ सप्टेंबर (वार्ता.) – पुसेसावळी येथील दंगलीमागे विक्रम पावसकर यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि धादांत खोटा आहे. वास्तविक या घटनेमागे दुसर्‍याच लोकांचा हात आहे. ज्या मुलाने आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केली, त्याला २४ घंट्यानंतर का अटक करण्यात आली ?, तसेच तो कराड येथे कशासाठी आला होता ? कराड येथे तो कुणाकुणाला भेटला ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, तसेच पुसेसावळी दंगली मागील सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी हिंदु एकता आंदोलनचे प्रांतीय अध्यक्ष विनायक (अण्णा) पावसकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

हिंदु एकता आंदोलनच्या वतीने कराड येथील विश्रामभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी हिंदु एकता आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सागर आमले, शिवसेनेचे काकासाहेब जाधव, हिंदुत्वनिष्ठ अजय पावसकर आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पुसेसावळीतील युवकांनी ‘आलमगीर औरंगजेब’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप कशासाठी काढला आहे ?

विनायक (अण्णा) पावसकर पुढे म्हणाले, ‘‘कलम १४४ असतांनाही सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात मुसलमान का गोळा झाले ? तेव्हा प्रशासन काय करत होते ? १९ ऑगस्टला हिंदूंचा मोर्चा झाल्यानंतर १५ व्या दिवशी आरोपींना जामीन झाला. या आरोपींनी पुन्हा पोस्ट प्रसारित केल्या, याविषयी चौकशी का झाली नाही ? बाहेरून आलेले लोक धार्मिकस्थळात कसे काय आढळून आले ? आरोपींना उपस्थित करणारे, त्यांना पाठीशी घालणारे कराड येथील अल्ताफ शिकलगार, साबीर मुल्ला, सातारा येथील सादिक शेख, रमजान कागदी, जमीर शेख, पुसेसावळी येथील बागवान हे लोक आहेत. यांनाही अटक झालीच पाहिजे. दंगलीमध्ये जे गेले त्यांचा ‘हुतात्मा’, असा उल्लेख का केला ? याचा अर्थ काय ? अशा वादग्रस्त पोस्ट नेहमी मुसलमान मुलेच का करतात ? पुसेसावळीतील संबंधित युवकांनी ‘आलमगीर औरंगजेब’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप कशासाठी काढला आहे ? त्याच्यावर कुठला मजकूर प्रसारित केला गेला ? कोणत्या पोस्ट पुढे पाठवल्या गेल्या ? आदींचीही चौकशी झाली पाहिजे.

यांतील काही जणांचे बाँबस्फोट प्रशिक्षण झाले आहे, असे ऐकण्यात आले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवराय यांची विटंबना करणे, बाँबस्फोट घडवणे यांच्याशी कराड आणि सातारा येथील ६ जणांचा काय संबंध आहे का ? यांच्या घराची तपासणी व्हावी. त्यांना अटक झालीच पाहिजे. सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ युवकांना पाकिस्तानमधून धमकी येते, यांमागे वरील ६ जण आहेत का ? याची सखोल चौकशी व्हावी. आमचे सर्व मावळे निर्दोष  आहेत. आम्ही सकल हिंदु समाज म्हणून त्यांच्यासमवेत कायमच रहाणार आहोत. त्यांनी मोर्चा काढला, तर आम्हीही सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढू.’’