कल्याण येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या !

  • मित्रांनी छेड काढल्याचे प्रकरण

  • मुलगी मित्रांसमवेत गेली होती हुक्का पार्लरमध्ये !

(प्रतिकात्मक चित्र)

(हुक्का पार्लर म्हणजे सामूहिक पद्धतीने धूम्रपान करण्याचे ठिकाण)

ठाणे, ११ सप्टेंबर (वार्ता.) – कल्याण (पश्‍चिम) येथे रहाणारी १६ वर्षीय मुलगी तिच्या मित्रांसमवेत हुक्का पार्लरमध्ये गेली होती. त्यानंतर या मुलांनी तिला एका मित्राच्या घरी नेऊन तिची छेड काढली. त्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या मुलीने रहात्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या मुलीच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीनंतर तिचा मृतदेह पुढील तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तिच्या संदर्भात नेमके काय घडले, याचा उलगडा होईल. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी मुलीची छेड काढणार्‍या ४ जणांच्या विरोधात पोक्सोसह भा.दं.वि. ३०६, ३५४, ३४, ८, १२ या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

  • लहानवयातच मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढणे, हे समाज आणि देश यांच्यासाठी घातकच !
  • तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी शिक्षक आणि पालक यांनीही त्यांच्याकडे वेळीच लक्ष देऊन त्यांचे प्रबोधन करावे !
  • मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांचे विचार प्रगल्भ होऊन त्यांना योग्य-अयोग्य यांची जाण वेळीच येईल !