भारतानंतर जपानचीही चंद्रमोहीम !

तनेगाशिमा अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्‍यात आलेले ‘एस्.आय.आय.ए.’ हे क्षेपणास्‍त्र

टोकियो (जपान) – भारताच्‍या ‘चंद्रयान-३’च्‍या यशानंतर इतर देशांनीही चंद्रावर उतरण्‍यासाठी मोहीम हाती घेतली आहे. जपानने चंद्रावर जाण्‍यासाठी पावले उचलली आहेत. जपानची अंतराळ संस्‍था ‘जपान एरोस्‍पेस एक्‍सप्‍लोरेशन एजन्‍सी’ने  (जे.ए.एक्‍स.ए.ने) ७ सप्‍टेंबर या दिवशी त्‍याची चंद्र मोहीम ‘मून स्नायपर’ चालू केली. तनेगाशिमा अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्‍यात आलेले ‘एस्.आय.आय.ए.’ हे क्षेपणास्‍त्र लँडर घेऊन चंद्राकडे झेपावले आहे. हे लँडर ४ ते ६ मासांमध्‍ये चंद्राच्‍या पृष्‍ठभागावर पोचेल.