
‘२१.१.२०२१ या दिवशी सकाळी मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरामध्ये नामजपाला बसले होते. त्या वेळी ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप सर्वांना करण्यास सांगितला होता. थोड्या वेळाने मला माझ्या हृदयमंदिरामध्ये गुरुदेव श्रीकृष्णाच्या रूपात सिंहासनावरती बसलेले दिसत होते. मी त्यांच्या चरणांवर नामजप अर्पण करत होते आणि ‘हे गुरुदेव, माझे षड्रिपू तुमच्या चैतन्याने गळून जाऊ देत. माझ्यात दैवी गुणांची वृद्धी होऊ दे. मी हे षड्रिपू घालवण्यासाठी असमर्थ आहे’, अशी प्रार्थना झाली. थोड्या वेळाने ‘प.पू. गुरुमाऊलींच्या चरणातून पांढरा प्रकाश माझ्या आज्ञाचक्रामध्ये जात आहे आणि तो संपूर्ण शरिरामध्ये पसरत आहे’, असे दृश्य मला ५ मिनिटे दिसत होते. त्या वेळी माझे मन संपूर्ण निर्विचार झाले होते. मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते. एक वेगळीच स्थिती मला अनुभवता येत होती. नंतर सहसाधिकेने कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले. तेव्हा मी भानावर आले. त्या वेळी मला पुष्कळ हलके आणि शांत वाटत होते.’
– सौ. संगीता चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२१)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !