‘श्री गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) क्षणभर जरी दर्शन झाले, तरी जन्मोजन्मीचा शीण निघून जातो. भगवंताचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) मोहक रूप पहातांना मन भावविभोर होते. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चरण हेच आपले अंतिम स्थान आहे. ‘यापेक्षा अजून काही प्राप्त करायला हवे’, असे जीवनात काहीच नाही. मनाच्या अशा स्थितीत सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.
डोळे भरून पाहीन आणि साठवीन तुज अंतरी ।
मग पाहीन मी पुनःपुन्हा तुझी मोहक मूर्ती अंतरी ।
हे गुरुराया, त्यातून मिळेल मज साधनेसाठी स्फूर्ती ॥ १ ॥
तुझे गोड बोल मी आनंदे ऐकीन ।
तुझी कीर्ती गातांना रंगून मी जाईन ।
तुझे स्मरण करतांना भावविभोर मी होईन ॥ २ ॥
अभिषेक करिती नेत्रजल तव चरणकमली ।
हस्तस्पर्श होता तुझा माथ्यावरी हर्ष होई अंतरी ।
चरणसेवा घडो क्षणोक्षणी हीच माझी आर्त मागणी’ ॥ ३ ॥
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२२)