जालना येथे आंदोलन करणार्‍या मराठा समाजाच्‍या बांधवांवर झालेली लाठीमाराची चौकशी करा ! -सकल हिंदु समाजाचे निवेदन

जालना येथील आंदोलनकर्त्‍यांवरील लाठीमाराचे प्रकरण

निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय तेली (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ 

कोल्‍हापूर – नुकतेच जालना येथे शांततेच्‍या मार्गाने आंदोलन करणार्‍या, उपोषणास बसलेल्‍या सकल मराठा समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात असंख्‍य कार्यकर्ते घायाळ झाले. याचा सकल हिंदु समाज तीव्र निषेध करत आहे. लाठी आक्रमणाचा आदेश देणारे अधिकारी, राजकीय नेते यांची चौकशी होऊन त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई व्‍हावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्‍या वतीने जिल्‍हा प्रशासनास देण्‍यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय तेली यांनी स्‍वीकारले. ‘सकल हिंदु समाज मराठा समाजाच्‍या या आंदोलनाविषयी सक्रीय सहभागी असून पूर्ण शक्‍तीनिशी सकल मराठा समाजाच्‍या मागे उभा आहे आणि राहील’, असेही त्‍या निवेदनात नमूद करण्‍यात आले आहे.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्‍यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेना उपजिल्‍हाप्रमुख श्री. उदय भोसले, बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे जिल्‍हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशीष लोखंडे, हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. राजू तोरस्‍कर, सेवाव्रत प्रतिष्‍ठानचे श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्‍वामी, भ्रष्‍टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्‍यक्ष श्री. आनंदराव पवळ, युवासेनेचे श्री. भाऊ चौगुले, श्री. सुशील भांदिगरे, हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. आबा जाधव उपस्‍थित होते.