पुणे येथील श्री. प्रणव अरवतकर यांना आलेल्या अनुभूती

१. साधनेचे ध्येय निश्‍चित करणे

कु. प्रणव अरवतकर

‘एकदा मला सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन लाभले. तेव्हा ‘माझ्या मनात साधनेची तळमळ अल्प आहे; कारण मी ध्येय ठेवलेले नाही’, याची मला जाणीव झाली. त्यानंतर ‘ध्येय ठेवून प्रयत्न करायचा’, असा माझ्या मनाचा निश्‍चय झाला. त्यानंतर मी अंतर्मनातून श्रीकृष्णाला सांगितले, ‘मला याच जन्मात ईश्‍वरप्राप्ती करायची आहे’, हे माझे ध्येय आहे.’

२. शंखनाद ऐकू येणे

युवा शिबिराच्या दिवशी दुपारी १.३५ वाजता नामजपादी उपायांचे सत्र चालू होण्यापूर्वी प्रार्थना करतांना मला शंखनाद ऐकू येत होता.’

– कु. प्रणव अरवतकर (वय २२ वर्षे), पुणे (१७.११.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक