ठाणे येथे शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखाची हत्या

(प्रतिकात्मक छायाचित्र)

ठाणे – येथील वसंत विहार भागातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी चितळसर पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. ठुबे यांच्या कुटुंबियांनी ३० ऑगस्टला चितळसर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. अक्षय यांचा मृतदेह कोकणीपाडा परिसरातील जंगलात आढळला. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.