रुग्‍णाईत असल्‍याने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवासाठी जाता न येणे; मात्र घरी असतांना त्‍यांच्‍या कृपेने सूक्ष्मातून ब्रह्मोत्‍सव सोहळा अनुभवता येणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. रुग्‍णाईत असल्‍याने ब्रह्मोत्‍सवासाठी जाता न आल्‍याने पुष्‍कळ वाईट वाटणे, स्‍वप्‍नात गुरुदेवांनी दर्शन दिल्‍यामुळे दिवस आनंदात असणे

‘११.५.२०२३ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव सोहळा होता. त्‍याच्‍या आदल्‍या दिवशी साधक बसने निघाले होते. त्‍या वेळी मी रुग्‍णाईत असल्‍याने साधकांच्‍या समवेत जाऊ शकले नाही. त्‍याचे मला पुष्‍कळ वाईट वाटले. मी प्रवासाची सिद्धता केली होती; पण मला जाता आले नाही. रात्री मला साक्षात् गुरुदेवांनी स्‍वप्‍नात दर्शन दिले. मी सकाळी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप करत उठले. माझ्‍या डोळ्‍यांत आनंदाश्रू आले. मी गुरुदेवांप्रती (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या प्रती) कृतज्ञता व्‍यक्‍त केली. गुरुदेवांचे मला प्रथमच स्‍वप्‍नात दर्शन झाले. मी दिवसभर त्‍याच आनंदात होते. मी सकाळपासून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव अनुभवत होते.

सौ. श्रद्धा धोपट

२. घरी राहून सूक्ष्मातून ब्रह्मोत्‍सवाचा आनंद अनुभवणे

मला वाटले, ‘दुपारपर्यंत सर्व साधक रामनाथी आश्रमात पोचले असावेत. बैठक व्‍यवस्‍था झाली असावी. गुरुदेव समोर झोपाळ्‍यावर महाविष्‍णूच्‍या स्‍वरूपात बसले असावेत. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ झोपाळा हलवत असाव्‍यात. गुरुदेवांवर पुष्‍पवृष्‍टी होत असावी.’ हे सर्व मी अनुभवत होते. या सगळ्‍यांचा आनंद आणि चैतन्‍य मला मिळाले. हे अनुभवत मी दुपारी झोपी गेले. मला दुपारी गुरुदेवांची मानसपूजाही अनुभवता आली. मला गुरुदेवांची प्रतिमा दिसत होती. त्‍या प्रतिमेला चाफ्‍याची फुले वाहिली होती. समोर रांगोळी काढली होती. माझा आनंद द्विगुणित झाला होता.

गुरुदेव माझ्‍यावर एवढी मोठी कृपा करत असलेली पाहून मी कृतज्ञता व्‍यक्‍त केली. ‘गुरुदेव माझ्‍या समवेत सतत असतात’, याची मला जाणीव झाली.’

– सौ. श्रद्धा महेश धोपट, दापोली, रत्नागिरी. (११.५.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक