|
शामली (उत्तरप्रदेश) – महिलांचे हात आता केवळ बांगड्या भरण्यासाठी राहिलेले नाहीत. महिला आता शस्त्रे बाळगण्यासाठीही इच्छुक आहेत. गेल्या काही वर्षांत शस्त्र परवाना मिळवण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. शहरापासून गावापर्यंत अनेक महिलांकडे शस्त्रपरवाना आहे. उत्तरप्रदेशमधील शामली जिल्ह्यात ८० महिलांनी शस्त्र बाळगले असून १४० महिलांची आवेदने प्रलंबित आहेत.
ज्यांच्या जिवाला धोका आहे किंवा ते गुन्हेगारीग्रस्त भागांत रहातात, त्यांनाच शस्त्र परवाना दिला जातो. पूर्वी केवळ पुरुषच शस्त्र परवान्यासाठी आवेदन करत असत; मात्र गेल्या काही वर्षांपासून महिलांकडूनही सातत्याने आवेदने येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत ते स्वसंरक्षणासाठी वापरले जाऊ शकते, असा त्यांचा दावा आहे. सध्या १० आवेदनांपैकी ४ आवेदने महिलांची असतात. ‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते पवनकुमार यांनी ही माहिती मिळवली आहे.
संपादकीय भूमिका
|