गुरुंविना हा भवसागर कुणीही तरून जाऊ शकत नसल्‍याची तुलसीदासांची शिकवण ! – सरश्री

सरश्री

पुणे – संत तुलसीदास यांनी गुरुकृपेच्‍या छत्रछायेत त्‍यांचे शिक्षण, दीक्षा आणि भक्‍तीची साधना चालू ठेवली. त्‍यानंतर ते वेदशास्‍त्राचे प्रकांड पंडित बनले. त्‍यांनी त्‍यांच्‍या रचनांमध्‍ये गुरुकृपेचे वर्णन केले आहे. गुरुंविना हा भवसागर कुणीही तरून जाऊ शकत नाही, ही महत्त्वपूर्ण गोष्‍ट तुलसीदासांच्‍या जीवनप्रवासातून समोर येते, असे मत ‘तेजज्ञान फाऊंडेशन’चे संस्‍थापक आणि ‘विचार नियम’ या बेस्‍ट सेलर (उत्तम विकल्‍या जाणार्‍या) पुस्‍तकाचे रचनाकार सरश्री यांनी व्‍यक्‍त केले. या वेळी ‘इंद्रधनुष्‍य विजेते, गोस्‍वामी तुलसीदास’ या सरश्री यांनी लिहिलेल्‍या पुस्‍तकाचे प्रकाशन नांदोशी येथील आश्रमात झाले, तसेच सरश्री यांचे ‘शानदार जीवन कसे जगावे ?’ या विषयावर व्‍याख्‍यान झाले. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले आदी उपस्‍थित होते.

सरश्री यांनी या वेळी व्‍यक्‍त केलेले विचार

१. प्रत्‍येक गोष्‍टीविषयी आभार मानून पूर्णतेचा आनंद घ्‍या.

२. मायेच्‍या दलदलीमधून बाहेर येण्‍यासाठी प्रत्‍येकाने ध्‍यानाचे महत्त्व ओळखा.

३. प्रत्‍येक गोष्‍ट माझ्‍या मनासारखी झाली पाहिजे, अशी मनीषा बाळगू नका.