मधुबनी (बिहार) येथे अस्मतुल्लाने स्वातंत्र्यदिनी जाळला राष्ट्रध्वज !

मधुबनी (बिहार) – येथील हरलाखी गावाचा सरपंच महंमद जुनैद याचा मुलगा महंमद अस्मतुल्ला याला १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज जाळल्याच्या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. अस्मतुल्ला याच्याकडून राष्ट्रध्वज जाळण्यात येत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अस्मतुल्ला याला कह्यात घेतले. त्याचे येथील उमगाव बाजारात वेल्डिंगचे दुकान आहे.

रील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

(म्हणे) ‘मुलगा मानसिकरित्या आजारी !’ – अस्मतुल्लाच्या वडिलांचा दावा

अस्मतुल्ला याचे वडील आणि सरपंच महंमद जुनैद यांनी दावा केला आहे की, त्यांचा मुलगा अस्मतुल्ला हा मानसिकरित्या आजारी आहे. त्याच्यावर उपचार केले जात आहेत. (मानसिकरित्या आजारी असणार्‍या व्यक्तीला भारताचाच आणि तोही स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज जाळण्याची बुद्धी कशी होते ? तो पाकिस्तानचा झेंडा का जाळत नाही ? अशा प्रकारे लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या अस्मतुल्लाच्या वडिलांवरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • देशातील मुसलमानांच्या देशभक्तीवर संशय का घेण्यात येतो ?, त्याच्याच अशा घटना दर्शक आहेत, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?
  • अशा देशद्रोह्यांना आता फाशीचीच शिक्षा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तरच अशा घटना कायमच्या थांबतील !