
शामली (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.चा भारतातील हस्तक कलीम आणि त्याचा भाऊ यांना अटक केली आहे. कलीम आणि त्याचा भाऊ पाकमधील आतंकवादी दिलशाद उपाख्य मियां याच्या संपर्कात होते. कलीम त्याला व्हॉट्सअॅप आणि अन्य सामाजिक माध्यमे यांद्वारे भारतीय सैन्याची माहिती पाठवत होता. त्याच्या चौकशीतून सहारनपूर येथील युसुफ समसी हाही त्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती मिळाली आहे. युसूफ या दोघांना बनवट कागदपत्रांद्वारे सीमकार्ड उपलब्ध करून देत होता. त्यांच्या आधारे कलीम आणि त्याचा भाऊ दिलशादशी संपर्क ठेवत होते. कलीस यासाठी युसूफ याला पैसे देत होता. पोलिसांनी आता सीमकार्डचे वितरण करणार्या टोळीची चौकशी चालू केली आहे.
सेंट्रल एजेंसी (IB) और UP एसटीएफ के ज्वाइंट ऑपरेशन की मदद से आईएसआई के इशारे पर हथियार इकट्ठा करने वाले एक एजेंट को गिरफ्तार किया गया है | @aap_ka_santosh | @arvindojha https://t.co/XqXckzpaRu
— AajTak (@aajtak) August 18, 2023
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रयत्न करावा ! |
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलनाचा ‘अजेंडा’ हाच आहे का ?
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !