
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या काही व्यक्तींमध्ये यांचा समावेश आहे –
१. अरुंधती रॉय : ज्यांचा असा विश्वास आहे की, काश्मीर हा भारताचा भाग नाही.
२. कॉलिन गोन्साल्विस : ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ या आक्रमणाचा आतंकवादी अजमल कसाब याच्यासाठी दयेची याचिका प्रविष्ट केली होती.
३. अधिवक्ता प्रशांत भूषण : ज्यांनी आतंकवादी याकूब रझाकची फाशी रोखण्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
४. नंदिता नारायण : ज्यांनी ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या विचारमंचावरून पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांची ‘बस नाम रहेगा अल्लाह का’ (केवळ अल्लाचेच नाव राहील), ही कविता म्हणून दाखवली.
५. कुणाल कामरा : ज्याने ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या मंचावरून टिप्पणी केली, ‘हे लोक ‘सीते’च्या पतीचे काम करत असतांना ‘नीता’च्या पतीचे नाव घेतात.’
हे सर्व पाहून हे ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा)च्या प्रश्नपत्रिका फुटीविरुद्धचे आंदोलन वाटते का ? जर ‘नीट’च्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळवणे, हा खरा उद्देश असता, तर प्रश्नपत्रिका फुटीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांचे पाल्य या घटनेमुळे दगावले, त्या पालकांना मंचावर संधी द्यायला हवी होती. त्याऐवजी हा विचारमंच ‘इस्लामो-लेफ्ट’ (इस्लामी-साम्यवादी) विचारसरणीच्या गटाच्या हवाली करण्यात आला. यावरून ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या निदर्शनांच्या आयोजकांचे प्राधान्यक्रम आणि या आंदोलनामागील खरा ‘अजेंडा’ (भूमिका) स्पष्ट होतो.
आंदोलनाचा वापर राजकीय किंवा वैचारिक अजेंड्याला पुढे नेण्यासाठी केला जात आहे का ?
सोनम वांगचुक यांनीही त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे, याकडे बारकाईने पाहिले पाहिजे. त्यांना केवळ एका प्याद्यासारखे वापरले जात आहे, तर इतर लोक त्यांच्या विश्वासार्हतेचा आणि जनमानसातील प्रतिमेचा वापर करून या आंदोलनाला वैधता मिळवून देत आहेत.
काही दिवसांपूर्वी स्वतः सोनम वांगचुक यांनी ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या मंचावरून सांगितले होते, ‘जेव्हा ते उपोषणावर होते, तेव्हा आंदोलनातील इतर लोक मात्र जेवण करत होते.’ त्यांनी उघडपणे स्वतःची निराशा व्यक्त करतांना म्हटले होते, ‘जर तुम्ही माझ्यासह बेमुदत उपोषणात सहभागी होऊ शकत नसाल, तर किमान एक दिवसाचा उपवास करा किंवा पाठिंबा दर्शवण्यासाठी एक वेळचे जेवण तरी टाळा.’ ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या निदर्शनांच्या किती आयोजकांनी त्यांच्या या आवाहनाला खरोखर प्रतिसाद दिला ? त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे की, लोकांच्या दृष्टीने ज्या उद्देशासाठी हे आंदोलन चालले आहे, त्याऐवजी याचा वापर एखाद्या मोठ्या राजकीय किंवा वैचारिक अजेंड्याला पुढे नेण्यासाठी केला जात आहे का ? कारण असे दिसते की, ‘कॉकरोच’चे आंदोलन ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचा विषय सोडून इतर सर्व सूत्रांसाठीचे विचारमंच बनले आहे.
(हेमंत कुंभार यांच्या फेसबुकवरून साभार)
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
पाप-पुण्य
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
शरिराचा वरचा किंवा खालचा भाग येथे आलेली सूज न्यून करण्यासाठी करावयाचा सर्वसाधारण व्यायाम आणि त्याचा योग्य क्रम !