डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव पाठवण्याच्या कालावधीत सरकारकडून मुदतवाढ !

मदरसा (प्रतिकात्मक छायाचित्र )

रायगड – डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मदरशांना १० ऑगस्टपर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील मदरशांनी हे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीकडे सादर करायचे आहेत.

मदरशात शिकणार्‍या विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणासमवेत विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि उर्दु या विषयांचे शिक्षण मिळणे हा मुख्य उद्देश आहे. तसेच पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, त्यांच्यात रोजगारक्षमता वाढवणे आणि त्यांची आर्थिक क्षमता वाढवणे यासाठी मदरसा आधुनिकीकरण आवश्यक आहे. मदरसा आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा देणे, ग्रंथालयांसाठी अनुदान देणे, शिक्षकांचे मानधन देणे आदी कामांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

  • मदरशांचे कितीही आधुनिकीकरण केले, तरी मुसलमानेतरांना ठार मारण्याची शिकवण मुलांना दिली जाणार, तोपर्यंत मुलांना कितीही आधुनिक शिक्षण दिले, तरी मुले कट्टरवादीच बनणार ! अनेक आंतकवादी हे उच्चशिक्षित आहेत आणि त्यांच्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी जिहादसाठी केला आहे, हे लक्षात घ्या !  
  • ‘मदरशांचे आधुनिकीकरण करून मुसलमान समाज नेमका किती प्रमाणात मुख्य प्रवाहात आला?’, हे जनतेसमोर येणे आवश्यक !