इंद्रिये म्‍हणती मनासी, आपले नाथ भूवैकुंठासी ।

श्रीमती ज्‍योती पाचडे

आली गुरुपौर्णिमेची पर्वणी इंद्रिये ठरवती गं मनी ।
जाऊनी भेटू त्‍यांसी, मोक्षदाते असती ते ।
भेटता होईल दैन्‍य दूरी, माघारी ते फिरणे नसे ।
इंद्रिये म्‍हणती मनासी, आपले नाथ (टीप १) भूवैकुंठासी (टीप २) ॥ १ ॥

गुरुमाऊली मोक्षदात्री, काय नेऊया भेेटीशी ।
टांगूया बुद्धी खुंटीशी, शरणागती अन् समवेत नम्रता ।
लागली तळमळ या जिवा, मुखाने करू गुरूंचा धावा ।
इंद्रिये म्‍हणती मनासी, आपले नाथ भूवैकुंठासी ॥ २ ॥

साधक हे नाम ऐकूनी, धावली गुरुमाऊली भेटीसी ।
भेटती दोघे कडकडूनी, डोळा घळघळा हे पाणी ।
कृतार्थ केले जीवनासी, केले दैन्‍य दूरी त्‍यांनी ।
इंद्रिये म्‍हणती मनासी, आपले नाथ रामनाथी वैकुंठासी ॥ ३ ॥

स्‍वभावदोष, अहं निर्मूलनासी, झोकून देऊ सेवेशी ।
सेवांचा प्रसाद देऊनी, दिधली प्रीतीची मेजवानी ।
अनुभवू आनंद मानसी, बनवू आश्रम घरासी ।
इंद्रिये म्‍हणती मनासी, आपले नाथ रामनाथी वैकुंठासी ॥ ४ ॥

टीप १ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

टीप २ – रामनाथी आश्रम

– श्रीमती ज्‍योती पाचडे, अकोला (जुलै २०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक