प्रार्थना करून आश्रमस्‍वच्‍छता केल्‍यावर पुढील सेवा करायचा उत्‍साहही वाढल्‍याचे लक्षात येणे आणि सेवेतून आनंद मिळणे

श्री. संपत जाखोटिया

माझ्‍याकडे आश्रमातील प्रसाधनगृह स्‍वच्‍छ करण्‍याची सेवा असते. ही सेवा चालू करण्‍यापूर्वी माझ्‍या मनात ‘स्‍वच्‍छता करायला नको’, असा विचार येत असे किंवा काही वेळा स्‍वच्‍छता करायचा कंटाळा येत असे. प्रार्थना करून स्‍वच्‍छता सेवा चालू केल्‍यानंतर माझ्‍या देहावरील अनिष्‍ट शक्‍तींचे आवरण दूर होत असल्‍याचे लक्षात आले, तसेच ती सेवा करतांना आनंद मिळतो. तसेच पुढील सेवा करायचा उत्‍साहही वाढल्‍याचे लक्षात आले. त्‍यामुळे आता स्‍वच्‍छता सेवा करायचा कंटाळा येत नाही.’

– श्री. संपत जाखोटिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक