वैकुंठीचा राणा (टीप) रथारूढ झाला ।
भूलक्ष्मी-श्रीलक्ष्मीसह दिंडीस चालला ॥ धृ. ॥
कणाकणात आनंद शिंपण्या । विश्व अंबरी ‘सच्चिदानंद’घन आला ॥
परमानंदाच्या वर्षावात । तृषार्त जीव चिंब चिंब भिजला ॥ १ ॥
द्वापरी रथारूढ होऊन तू । ब्राह्म-क्षात्रतेजाने सजला ॥
कलियुगी रथारूढ परि । कृपाळू ‘भक्तवत्सल’ भावला ॥ २ ॥
तुझ्या परम दिव्य तेजापुढे । सूर्यदेवही झाकोळला ॥
तुझ्या कृपावर्षावात न्हाऊन । वरुणराजा वर्षाव करण्या विसरला ॥ ३ ॥
तेजोनिधी दिव्य तू । आम्हां लेकरांसाठी शीतल झाला ॥
तूच आम्हां लेकरांत । कृतज्ञताभावे प्रगटला ॥ ४ ॥
नृत्यलीला, रासलीला । उत्कट तुझी भावलीला ॥
गोपींसवे मुरलीधरा । तूच ना रे फेर धरिला ॥ ५ ॥
श्रीहरि, श्रीराम कि श्रीकृष्ण । कुणा पाहू तेच उमजेना ॥
मन आतुर परि । तुझे रूप अंतरी साठवण्या ॥ ६ ॥
प्रीतीकवेत लेकरा घेऊन । भक्तमेळ्यात तू चालला ॥
दिंडीरूपाने विश्वात तू । ‘रामराज्या’चा श्वास रुजवला ॥ ७ ॥
पुढे चाले माझा श्रीहरि । मागे हिंदु राष्ट्राचा मेळा ॥
देवलोकातून देवताही । करती पुष्पवर्षाव सोहळा ॥ ८ ॥
विश्वव्यापक ब्रह्मांडनायक पाहूनी । कालवेगही स्तब्ध झाला ॥
अनिष्टास करूनी इष्ट तू । ‘रामराज्या’चा आरंभ केला ॥ ९ ॥
आलो शिरसाष्टांग शरण तुज । घे चरणांसी अखिल जिवांना ॥
होऊ तव आनंदाशी एकरूप । हाच एक वर दे आम्हाला ॥ १० ॥
चरणदास आम्ही भाग्यवंत । तुझ्या सेवेचे भाग्य लाभले ॥
तुझ्या प्रीतीवर्षावाने देवा । सकल साधक धन्य धन्य झाले ॥ ११ ॥
टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’
– अश्विनी कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२७.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |