मिशनरी निधीच्या उभारणीत भ्रष्टाचाराचा धोका ! – पोप फ्रान्सिस

व्हॅॅटिकन सिटी – पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनमधील मिशनरी निधी उभारणार्‍यांना त्यांच्या कामात आर्थिक भ्रष्टाचार होऊ देऊ नका, अशी चेतावणी नुकतीच दिली. विकसनशील देशांमध्ये कॅथॉलिक चर्चच्या मिशनरी कार्यासाठी निधी उभारणार्‍या व्हॅटिकनच्या ‘पॉन्टिफिकल मिशन सोसायटी’च्या संचालकांना संबोधित करतांना पोप फ्रान्सिस बोलत होते.

पोप फ्रान्सिस पुढे म्हणाले की, मिशनरी कार्यात अध्यात्माची कमतरता असेल आणि ते केवळ उद्योजकतेशी संबंधित असेल, तर भ्रष्टाचार लगेचच फोफावतो. आजही वृत्तपत्रांमध्ये चर्चमधील भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याचे आपण पाहिले आहे. व्हॅटिकनने अमेरिकेतील चर्च शाखेतील कर्मचार्‍यांच्या स्थलांतराविषयी पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

‘यावरून चर्च संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? हिंदूंच्या मंदिरांवर कथित भ्रष्टाचाराचा आरोप करून ती कह्यात घेणार्‍या सरकारी यंत्रणा चर्चमधील भ्रष्टाचाराविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !