चीनमध्ये १३ व्या शतकातील मशिदीचे नवीन बांधकाम पाडण्याला स्थानिक मुसलमानांचा विरोध

पोलिसांकडून बळाचा वापर

बीजिंग (चीन) – चीनमधील यूनान प्रांतातील नागू भागातील नाजियिंग मशिदीचे घुमट पाडण्याला स्थानिक मुसलमानांनी विरोध केला. गेल्या आठवड्यात चीनच्या पोलिसांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला स्थानिक मुसलमानांकडून विरोध करण्यात आला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्या वेळी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. काही जणांना अटक करण्यात आली, तसेच अनेकांना ६ जूनपर्यंत शरण येण्याचा आदेश देण्यात आला.

या मशिदीचा विस्तार करण्यात आला होता. हा विस्तार अनधिकृत असल्याचे सांगत चीनकडून तिच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.