सॅनफ्रॅन्सिस्को (अमेरिका) येथे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात खालिस्तानची मागणी !

खलिस्तानी झेंडेही फडकावले !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

सॅनफ्रॅन्सिस्को (अमेरिका) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. ३१ मे या दिवशी कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी भारतियांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी काही लोकांनी खलिस्तानी झेंडे फडकावले, तसेच खलिस्तानची मागणी करणार्‍या घोषणाही दिल्या. या घटनेचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या घटनेचे दायित्व भारतात बंदी घालण्यात ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी संघटनेने स्वीकारले आहे.

‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने या घटनेचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. तो म्हणाले की, वर्ष १९८४ च्या शीख दंगलीत आम्ही काय केले, हे सर्वांनी पाहिले आहे का ? राहुल गांधी अमेरिकेत कुठेही जातील. खलिस्तान समर्थक शीख त्यांच्यासमोर उभे रहातील. २२ जून या दिवशी मोदी यांची पाळी असेल.

संपादकीय भूमिका

यावरून काँग्रेस आणि खलिस्तानी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप कुणी केल्यास त्यात चुकीचे काय ?