नवी देहली – ओटीटी (ओव्हर द टॉप) मंचावर प्रसारित होणारे, चित्रपट, वेबसीरिज, तसेच अन्य चित्रणांमध्ये तंबाखूविरोधी चेतावणी देण्याचा आदेश केंद्रशासनाने दिला. अशी चेतावणी न दिल्यास संबंधित निर्मात्यांवर कारवाई करण्याचेही केंद्राने म्हटले आहे. असा नियम करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. ओटीटीवरून प्रसारित होणार्या चित्रपट आणि वेबसीरिज यांमधून अनेकदा धुम्रपान, मद्यपान आदी दृश्ये दाखवली जातात. यामुळे धुम्रपान आणि मद्यपान सेवनाचा प्रसार होऊ शकतो. ते रोखण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे. ३१ मे या दिवशी असलेल्या जागतिक तंबाखूविरोध दिनानिमित्त केंद्र सरकारने याविषयी अधिसूचना प्रसारित केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, तसेच इतर भागधारक यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ओटीटी मंचावर तंबाखूविरोधी चेतावणीसाठी नवीन नियम सिद्ध केले आहेत.
स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय ने OTT प्लेटफार्मों पर तंबाकू विरोधी चेतावनी के लिए नए नियमों की अधिसूचना जारी की है। यह अधिसूचना OTT प्लेटफार्मों को तंबाकू विरोधी चेतावनी संदेश दिखाने के लिए बाध्य करती है। दिशानिर्देशों का पालन ना करने पर सख्त कार्रवाई की जाएगी। pic.twitter.com/igfkeByAIb
— NBT Hindi News (@NavbharatTimes) May 31, 2023
काय आहेत नियम ?
चित्रपट, वेबसीरिज आदींच्या प्रारंभी आणि मध्यभागी किमान ३० सेकंदाची तंबाखूविरोधी आरोग्य चेतावणी दाखवणे अनिवार्य आहे. कार्यक्रमाच्या वेळी तंबाखू उत्पादने किंवा तत्सम गोष्टींचा वापर प्रदर्शित केल्यावर स्क्रीनच्या तळाशी एक प्रमुख स्थिर संदेश म्हणून तंबाखूविरोधी चेतावणी प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यांसह किमान २० सेकंदांचा व्हिडिओदेखील प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाअशी चेतावणी दिल्याने तंबाखूसेवन थांबत नाही किंवा बंद होत नाही, तर त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे ! |