|
दुर्ग (छत्तीसगड) – गेल्या अनेक वर्षांपासून भारतात ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने आयात केली जात आहेत. मुसलमानांव्यतिरिक्त इतर धर्माच्या लोकांना हलाल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी ४७ सहस्र रुपये द्यावे लागतील. आतापर्यंत हलालची ही संकल्पना केवळ मांस आणि इस्लामी देशांमध्ये उत्पादने निर्यात करण्यापुरती मर्यादित होती. आता देशातील सर्व उत्पादने हलाल म्हणून प्रमाणित होऊ लागली आहेत. अन्न आणि औषधे यांसाठी भारत सरकारची अधिकृत संस्था असतांना वेगळ्या हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता काय ? भारतातील केवळ १५ टक्के मुसलमानांसाठी ८५ टक्के हिंदु आणि इतर समाज यांवर यापुढे हलाल उत्पादने लादणे सहन केले जाणार नाही. एकीकडे भारत ‘निधर्मी’ असल्याचे, तर दुसरीकडे दैनंदिन वापरातील वस्तूंना धर्माच्या आधारे प्रमाणित केले जात आहे. या अघोषित हलाल सत्तेच्या विरोधात ‘हलालमुक्त छत्तीसगड’ ही मोहीम हिंदु जनजागृती समिती सर्व संघटनांच्या साहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात व्यापकपणे राबवणार आहे, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दुर्ग येथील सोनाली रेस्टॉरंटमध्ये आयोजित ‘पत्रकार परिषदे’त ते बोलत होते.
या वेळी ‘बजरंग दल’, छत्तीसगड प्रांतचे श्री. रतन यादव, ‘बजरंग दला’चे विभाग संयोजक सर्वश्री रवी निगम, हृतिक सोनी; ‘मिशन सनातन’चे अध्यक्ष श्री. मदन मोहन उपाध्याय, गोरक्षक श्री. अंकित द्विवेदी, ‘हिंदु जागरण मंच’च्या प्रांत सहसंयोजिका सौ. ज्योती शर्मा, ‘लक्ष्य सनातन संगम’चे राष्ट्रीय सल्लागार श्री. विकास तामरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘या अभियानाच्या अंतर्गत संपूर्ण राज्यात ‘ऑनलाईन अभियान’ आणि ‘सोशल मिडिया’च्या (सामाजिक माध्यमे) माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे, ‘हलालविरोधी परिषदा’ आयोजित करणे, पत्रके वाटणे, व्यावसायिकांच्या बैठका घेणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.’’
‘धर्मांतरमुक्त छत्तीसगड’ समवेतच आज ‘हलालमुक्त छत्तीसगड’ मोहिमेची घोषणा करतो ! – रतन यादव, बजरंग दल, छत्तीसगड प्रांत
आज छत्तीसगडमध्ये कार्यरत असलेल्या अनुमाने २२ हिंदुत्वनिष्ठ संघटना आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे आमची मागणी मांडणार आहोत. आम्ही समाजाला जागृत करण्याचे कामही करू तसेच व्यावसायिकांमध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करू. त्यामुळे आम्ही ‘धर्मांतरमुक्त छत्तीसगड’ समवेतच आज ‘हलालमुक्त छत्तीसगड’ मोहिमेची घोषणा करत आहोत.
आपण हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी करून आतंकवाद्यांना साहाय्य करत आहोत ! – मदन मोहन उपाध्याय, अध्यक्ष, मिशन सनातन
आज आपल्यापैकी प्रत्येक जण नकळत हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी करून आतंकवादी कारवायांसाठी निधी पुरवत आहे. आपल्यासमोर ही अत्यंत गंभीर समस्या आज उभी आहे. त्यामुळेच प्रत्येक देशभक्ताने हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार टाकणे आणि याविषयी इतरांनाही जागरूक करणे आवश्यक आहे.