इंदूर येथील हिंदु युवतीकडून लव्ह जिहाद्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

  • ‘द केरल स्टोरी’ चित्रपट पाहिल्याचा सकारात्मक परिणाम !

  • खानकडून युवतीवर बलात्कार आणि धर्मांतराचा दबाव आणल्याचा आरोप !

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील खजराना क्षेत्रातील एका हिंदु युवतीने तिचा मुसलमान प्रियकर फैजान खान याच्या विरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘द केरल स्टोरी’ चित्रपट पाहिल्यामुळे युवतीला फैजानच्या विरोधात तक्रार करण्याचे धाडस झाले, असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी फैजानला अटक केली आहे.

फैजानने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. गेल्या काही कालावधीपासून ते एकत्र रहात होते. ती एकटी नोकरी करते, तर तो बेरोजगार आहे. गेल्या अनेक मासांपासून फैजान तिचा छळ करत होता. फैजानने तिच्याशी विवाह करण्याचे आश्‍वासन देऊन तिच्यासमवेत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले होते. तो तिच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणत असे. तिने त्यास विरोध केला असता तो तिला मारहाणही करत असे. ‘तू इस्लामचा स्वीकार केला नाहीस, तर तुझी आई आणि भाऊ यांची हत्या करीन’, अशा प्रकारे तो तिला धमकावत असे.

(सौजन्य : Mradubhashi) 

काही दिवसांपूर्वी दोघांनी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट पाहिला. १८ मे या दिवशी फैजानने तिला ‘तू धर्मांतर कधी करणार आहेस ?’, असे विचारले. तिने त्यास विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण केली. यानंतर तिने धाडस करून त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली, अशी माहिती इंदूर येथील पोलीस अधिकारी दिनेश वर्मा यांनी दिली. फैजानच्या विरोधात बलात्कार, मारहाण आणि धर्मपरिवर्तन अधिनियम यांच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहितीही शर्मा यांनी दिली.

संपादकीय भूमिका

‘द केरल स्टोरी’ चित्रपटामुळे आज हिंदूंना धर्मशिक्षणाचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यावर साधना करण्याचे संस्कार झाले, तर लव्ह जिहाद्यांचे हिंदु युवतींकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्यच होणार नाही, हे लक्षात घ्या !