पुणे – गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराला ‘क’वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, ‘क’वर्ग पर्यटनस्थळ आणि तीर्थक्षेत्र विकास यांसाठी ३ कोटी १० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. राज्यातील गड, मंदिरे आणि महत्त्वाची संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन करण्याच्या योजनेअंतर्गत ४१ कोटी ९३ लाख रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
संपादकीय भूमिकाभक्तांनो, मंदिरे पर्यटनस्थळे झाली तरी तेथील चैतन्य नष्ट न होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! |