सुलेमानी आक्रमणकर्त्यांनी केलेल्या अत्याचाराची समर्थ रामदासस्वामी यांनी अत्यंत योग्य शब्दांत मांडणी केली आहे; पण त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराजा पृथ्वीराज चौहान यांच्यासारख्या शूरांनी मुसलमान आक्रमणकर्त्यांचा हेतू साध्य होऊ दिला नाही. असे असले, तरी ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पाहिल्यावर मुसलमान आक्रमणकर्ते अजूनही जिवंत आहेत, याची प्रचीती येते. या चित्रपटात शालिनी, गीतांजली आणि निमा या तीन मुलींचे धर्मांतर करण्यासाठी आसिफा दोन मुसलमान तरुणांची भेट करवून देते. पुढे त्या दोन मुसलमान तरुणांना त्यांचा म्होरक्या धर्मांध मुसलमान सांगतो, ‘‘जे काम अकबर, औरंगजेबने अपूर्ण ठेवले आहे, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. सर्वत्र इस्लामी स्टेट निर्माण करायचे आहे.’’ त्यावरून हा ‘अजेंडा’ (कार्यसूची) आताचा नाही, अनेक दशकांपासूनचा आहे. ज्याच्या विरोधात त्या-त्या वेळी हिंदु राजांनी प्राणाची पर्वा न करता त्याचा विरोध केला आणि हिंदु धर्माचे रक्षण केले. प्रश्न आता २१व्या शतकाचा आहे. आजही समर्थ रामदासस्वामींची पुढील शब्दरचना आठवत आहे.
किती गुज्रिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या ।
किती शांमुखी जाहाजी फाकवील्या ।
कितीयेक देशांतरी त्या विकील्या ।
किती सुंदरा हाल होवोनि मेल्या ।।
– श्रीसमर्थकृत ‘अस्मानी सुलेतानी’, प्रबंध १, श्लोक १
महिला गायब झाल्याची वस्तूस्थिती नाकारणे चुकीचे !
अशा परिस्थितीत जर हिंदूंमध्ये जागृती करणारा ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित होतो. तेव्हा त्या चित्रपटात ‘३२ सहस्र मुली गायब आहेत’, असे शालिनी संयुक्त राष्ट्रांच्या कोठडीमध्ये चौकशीच्या वेळी सांगते. सध्या त्याचे भांडवल केले जात आहे.
‘हा आकडा नक्की कुठून आला ?’, अशी विचारणा होत आहे, हे दुर्दैवी आहे. या चित्रपटाला जाणीवपूर्वक विरोध करणार्यांनी या मुद्याचे भांडवल करत ‘जर हा आकडा चुकीचा आहे, तर या चित्रपटाची कथाचा खोटी आहे. मुसलमान धर्माची अपकीर्ती करण्याचे हे कारस्थान आहे’, असा आरोप चालू केले आहेत. त्यामुळे आता हा आकडा नक्की कुठून आला ? यावर चर्चा चालू झाली आहे. वास्तविक महिला गायब झाल्या आहेत, ही वस्तूस्थिती असून ती नाकारता कामा नये. केरळमधील जरी ३२ सहस्र महिलांचा आकडा नसेल, तरी मात्र तितक्याच संख्येने महिला गायब आहेत, याचा प्रत्यय ‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या (‘एन्.सी.आर्.बी.’ – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या) अहवालातून येतो.
काय सांगतो ‘एन्.सी.आर्.बी.’चा अहवाल ?
‘एन्.सी.आर्.बी.’च्या अहवालातील वर्ष २०१६ ते २०१८ या ३ वर्षांमध्ये महिला बेपत्ता झाल्याची आकडेवारी येथे दिली आहे.
– श्री. नित्यानंद भिसे (साभार : ‘हिंदुस्थान पोस्ट’, १५.५.२०२३)