आसाममध्ये आम्ही ६०० मदरसे बंद केले, आणखी ३०० मदरसे बंद करणार ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

करीमनगर (तेलंगाणा) – आसाममध्ये आम्ही आतापर्यंत ६०० मदरसे बंद केले. यंदाच्या वर्षी आणखी ३०० मदरसे बंद करणार आहोत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी दिली. ते करीमनगर येथील एका सभेत बोलत होते. आम्हाला मदरसे नको आहेत, तर शाळा, महाविद्यालये आणि विद्यापिठे हवी आहेत. ‘आसाममधील लव्ह जिहाद रोखण्यासाठी आम्ही काम करत आहोत’, असेही त्यांनी सांगितले.

जानेवारी २०२३ मध्ये मुख्यमंत्री सरमा म्हणाले होते की, आम्हाला राज्यातील मदरशांची संख्या न्यून करायची आहे. आम्ही मदरशांमध्ये सामान्य शिक्षण देऊ इच्छितो आणि मदरशांमध्ये नोंदणी प्रणाली चालू करू इच्छितो. यासाठी आम्ही अल्पसंख्याक समाजासमवेत काम करत आहोत आणि अल्पसंख्य समाजही आम्हाला साहाय्य करत आहे. यापूर्वी सरमा यांनी कर्नाटकमधील बेळगाव येथे एका सभेला संबोधित करतांना ‘बांगलादेशातून लोक आसाममध्ये येतात आणि आपली सभ्यता, संस्कृती धोक्यात आणतात’, असे विधान केले होते.

संपादकीय भूमिका

सर्वच  भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी असे धोरण अवलंबले पाहिजे !