देहली येथे पार पडले कुत्र्यांच्या आक्रमणांपासून उपाय शोधण्यासाठीचे चर्चासत्र !

विजय गोयल

नवी देहली – येथील ‘काँन्स्टिट्यूशन क्लब’मध्ये १० मे या दिवशी कुत्र्यांच्या आक्रमणाच्या धोक्यावर उपाय शोधण्याविषयी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते विजय गोयल यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी काही जणांनी या चर्चासत्राला विरोध करतांना गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. प्राणीप्रेमी मेनका गांधी समर्थकांकडून समांतर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

१. गोयल यांनी सांगितले की, देशात ६ कोटी ४० लाख कुत्री आहेत. केवळ देहलीमध्येच ६ लाख कुत्री आहेत. सध्या ही कुत्री लोकांना चावत आहेत. यामुळे जनता त्रस्त आहे. लोक हातात दांडके घेऊन चालत आहेत.

२. या चर्चासत्रामध्ये कुत्र्यांची नसबंदी करण्याचा, तसेच त्यांची गणना करण्याा निर्णय  देहली महापालिकेकडून घेण्यात आला. याखेरीज सर्व कुत्र्यांना रेबिजचे इंजेक्शन देण्यासह बेवारस कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी राष्ट्रीय धोरण सिद्ध करण्याची मागणीही करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

असे चर्चासत्र का आयोजित करावे लागते ? सरकारला जनतेची समस्या कळत नाही का ?