पाकिस्तानमध्ये मुलीच्या विनयभंगाला विरोध करणार्‍या हिंदु पित्याचा जिहाद्यांनी केला शिरच्छेद !

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका हिंदु पित्याने त्यांच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या जिहाद्यांना विरोध केला. या रागातून जिहाद्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. अलमाख भील असे मृत हिंदु व्यक्तीचे नाव आहे.

१. पाकिस्तानातील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सिंध प्रांतातील शाहदादपूर येथे काही मुसलमान तरुणांनी अलमाख भील यांच्या मुलीचा विनयभंग केला होता.

२. अलमाखने मुसलमान तरुणांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी ‘पाकिस्तान दरावर इत्तेहाद’ या हिंदु संघटनेचे साहाय्य घेतले. याची माहिती मिळताच त्या मुसलमान तरुणांनी अलमाख भील यांचा शिरच्छेद केला. (भारतात मुसलमानांची तळी उचलणार्‍या सेक्युलरवादी आणि पुरोगामी यांनी पाकिस्तानमध्ये हिंदू अत्याचाराच्या विरोधात तक्रारही करू शकत नाही, हे लक्षात घ्यावे ! – संपादक)

३. पाकिस्तानात अल्पसंख्यांक हिंदूंवर आक्रमणे चालूच आहेत. यापूर्वी ३० मार्च २०२३ या दिवशी पाकिस्तानातील कराची येथे हिंदु डॉक्टर बिरबल गेनानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याचप्रमाणे ७ मार्च २०२३ या दिवशी सिंध प्रांतात प्रसिद्ध डॉक्टर धरम देव राठी यांची हत्या करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित !